विरोधकांनी कितीही वार केले तरी मुस्लिम समाज आणि माझ्यात तूसुभरही अंतर पडणार नाही ; आ.यड्रावकर यांची औरवाडच्या सभेत विरोधकांना चपराक

औरवाड : मुस्लिम समाजाचे व माझे संबंध इतके जवळचे आहेत की विरोधकांनी कितीही वार केले तरी आमच्या संबंधांमध्ये तुसूभरही अंतर पडणार नाही,याची खात्री मला आहे. ज्या – ज्या वेळेला माझ्यावर संकटे आली तेव्हा मुस्लिम समाज माझ्या पाठीशी उभा होता,आणि मुस्लिम समाजावर ज्या – ज्यावेळी संकटे आली त्या – त्या वेळी राजेंद्र पाटील यड्रावकर हा छातीचा कोट करून पुढे राहिला,आणि यापुढे राहणार आहे. मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आजपर्यंत कार्यरत राहिलो आहे,यापुढेही कार्यरत राहीन, आणि आपल्यात जो जीवाभावाच्या पलीकडचा जिव्हाळा आहे,तो कायम ठेवूया,अशी अपेक्षा राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केली.

 

 

 

औरवाड येथे झालेल्या सभेत आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते. प्रारंभी स्वागत मुस्ताक पटेल यांनी केले.यावेळी दादेपाशा पटेल,रशिद पटेल, लतिफ पटेल,राजू रावण,आनंदा पाटील यांनी आपल्या मनोगतातून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर कार्याचा आढावा घेतला.

यावेळी सतीश मलमे,प्रमोदादा पाटील, रणजीत पाटील,स्वरूपाताई पाटील यड्रावकर,मुकुंद गावडे,राकेश खोंद्रे, इम्तियाज पटेल,साहेबपाशा पटेल,कादर पटेल,आप्पासाहेब म्हैशाळे, सरपंच शफी पटेल,उपसरपंच अफसर पटेल,सईद पटेल गुरुजी,लतीफ पटेल, राजू रावण,बाशु मुल्ला,राजू गावडे, नारायण गावडे,आनंदा पाटील,विजय दुग्गे,मल्लापाण्णा चौगुले,यासीन बहादूर,रवी माने,अण्णाप्पा कांबळे, अकलाख पटेल,तनवीर बहादूर,रामा रावण,दीपक रावण,रशिद पटेल,सत्तार पटेल,सुधाकर एरंडवले,जमीर पटेल,पोपट गावडे,विशाल दुग्गे,लक्ष्मण जगताप,संजय कांबळे,बाबासो मुल्ला यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706