मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राजेश क्षीरसागर यांच्या कार्य अहवालाचे अनावरण

कोल्हापूर : विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर कार्य अहवालाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. ही पुस्तिका एक कार्य अहवाल तर आहेच शिवाय ही एक संघर्ष गाथा देखील आहे. ज्यामध्ये गेल्या काही वर्षातील जनतेसाठी केलेल्या संघर्षाचे सचित्र वर्णन दिले आहे.
क्षीरसागर यांचा कार्य अहवाल हा सर्वांगीण कामाचे प्रगती पुस्तक असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी काढलेले उद्गार गेल्या काही वर्षांच्या कामाची पोच पावतीच म्हणावी लागेल.

 

 

पुस्तिकेच्या अनावरणावेळी खासदार मा.धैर्यशील माने, करवीर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मा.चंद्रदीप नरके, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आदिल फरास, मा. अजित नरके व इतर मान्यवर उपस्थित होते.