शिवनाकवाडी : राज्य शासनाच्या सर्व योजना शिरोळ तालुक्यातील तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी काम केले आहे. याचबरोबर तालुक्याचा सर्वांगिण विकास त्यांनी साधला आहे.या सर्वच कामामुळे आज शिरोळ तालुका आदर्शवत ठरला आहे.त्यामुळे शिवनाकवाडीतून आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांना १ हजार मताचे लिड देणार असल्याचा विश्वास जेष्ठ नेते भुपाल खोत यांनी केले.
राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवणकवाडी येथील मतदारांशी संवाद साधला,यावेळी गावातून प्रचार फेरी काढण्यात आली.येथील ग्रामपंचायत लगत सभा संपन्न झाली,यावेळी खोत बोलत होते.स्वागत गणेश कुरणे यांनी केले. किरण बरगाले,गणपती उमराणी यांनी आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रमोददादा पाटील,पोपट पुजारी,प्रकाश पाटीत टाकवडेकर, दशरथ काळे,सतिश बरगाले,रविंद्र शहापुरे,जगन्नाथ जाधव,दत्ता आरगे, सुरेश सावर्डेकर,विद्याधर कांबळे, आनंदराव कांबळे,चंद्रकांत कांबळे, भीमराव कांबळे,सचिन सातारे,राजू सकणे,पापा आरगे,नितिन आरगे, महादेव बेडकिहाळे,प्रकाश खोत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.