ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ सतेज पाटील यांनी कळंबा फिल्टर हाऊस प्रभागातील नागरिकांच्या घेतल्या भेटी

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील कळंबा फिल्टर हाऊस प्रभागातील साळुंखे पार्क तसेच गणेश कॉलनी या ठिकाणी आमदार सतेज पाटील यांनी भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. आमदार ऋतुराज पाटील यांनी केलेल्या विकासकामामुळे त्यांना निवडणून देण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करण्याचे नागरिकांनी ठरवले आहे.

 

 

यावेळी माजी नगरसेवक आर. ए. पाटील, मधुकर रामाणे, अशोक रेडकर यांच्यासह दत्तात्रय फराकटे, श्रीकांत मनोळे, श्री. पन्हाळकर, श्री. चौगुले तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

🤙 8080365706