कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोहोळ विधानसभा मतदारसंघ व पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील भीमा परिवारातील सदस्यांची विचार विनिमय बैठक पुळूज येथे आयोजित केली होती. या बैठकीमध्ये धनंजय महाडिक यांनी सर्व सदस्यांची मते जाणून घेतली व त्यांच्याशी संवाद साधला.या बैठकीदरम्यान मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार . यशवंत माने व पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांना पाठिंबा देऊन प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला.

नरेंद्र मोदी व सहकार मंत्री तथा गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी व कल्याणासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी, बळीराजा मोफत वीज, शेतकरी सन्मान निधी योजना यासारखे निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतले आहेत. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन करण्यासाठी यशवंत माने व समाधान आवताडे या महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊया असे आवाहन महाडिक यांनी यावेळी उपस्थितांना केले.
यावेळी गणेश झाडे, ब्रम्हदेव गोपणे, संजय खिलारे, शंकर वाघमारे, सुनिल दादा चव्हाण, विशाल वाघमारे, संतोष पाटील,बाळासाहेब काळे, पै. अफसर शेख, प्रमोद काका, भारत पाटील, सुशील कक्षीरसागर,महेश सोहनी, शशिकांत गावडे, रमेश माने, अविनाश पांढरे, दिपक पुजारी, गुरुराज तागडे, हरिभाऊ काकडे, संजय वाघमोडे, बापु जाधव, मुबीना मुलाणी, प्रियांका परांडे, विश्वास महाडिक , विनोद महाडिक , पवन महाडिक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
