शिरढोण : दे.भ.रत्नापाण्णा कुंभार यांच्यानंतर शिरोळ तालुक्याचा विकास आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हातून घडत आहे.कोरोना कालावधीत त्यांनी केलेले काम आम्ही जवळून पाहिले आहे. सर्व समाजाला बरोबर घेवून जाणारा नेता म्हणून आमदार यड्रावकर यांच्याकडे पहावे लागेल,त्यामुळे अशा नेत्याला भरघोस मतांनी निवडून देवून शिरोळ तालुक्याच्या विकासाची गंगा वाहती ठेवावी,असे आवाहन विश्वास बालिघाटे यांनी केले.

राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या जनसंवाद यात्रेनिमित्त आयोजित सभेत बालीघाटे बोलत होते.
प्रारंभी स्वागत सचिन मालगावे यांनी केले.यावेळी शक्ती पाटील,अविनाश पाटील,पोपट पुजारी,चंद्रकांत मोरे यांनी आपल्या मनोगतातून आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विजयाचा निर्धार केला.
यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कार्याची माहिती घेऊन यापुढेही शिरोळ तालुक्याचा भरघोस विकास करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.
यावेळी बाबुराव कोईक,बाळामिया मुजावर,कल्लापा कोईक,पोपट पुजारी, दिलीप पाटील,महादेव सुर्यवंशी,सचिन कोईक,रावसाहेब यमकनमर्डे,विजय सुर्यवंशी,विद्यासागर पाटील,प्रवीण दानोळे,सचिन मालगावे,आदिनाथ बालिघाटे,सुशांत सासणे,डॉ.सुहास कांबळे,महंमदअली मुजावर,अविनाश पाटील,आनंदा सासणे,प्रकाश माणगांवे,अजित चौगुले,जयपाल माणगावे,भास्कर कुंभार,धोंडीराम नागणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
