कोल्हापूर : राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरदवाड येथे मतदारांशी संवाद साधला. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक बी.एन. मगदूम यांनी केले.यावेळी अरुण खरमाटे,अशोक मगदूम यांनी आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विजयाचा निर्धार केला.आमदार यड्रावकर यांनी गेल्या पाच वर्षात सर्व समाजाला घेऊन तालुक्यात विकासाची गंगा आणली आहे.त्यांच्या विकास कामामुळे शिरोळ तालुक्यातील सर्वच गावे प्रगतीपथावर आहेत.त्यामुळे त्यांच्या विकास कामाला तोड नाही,असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते लक्ष्मण माने यांनी केले.

यावेळी छत्रपती ग्रुपचे प्रमोददादा पाटील,बबलू चव्हाण,प्रकाश पाटील टाकवडेकर,पोपट पुजारी,सरपंच सुजाता कोळी,आशा पाटील,अशोक मगदूम,सयाजी पाटील,भीमराव कांबळे,महादेव कोळी,सुशांत चावरे, किरण तटमुटे,डि.के.चौगुले,महादेव पाटील,हरिदास पाटील,बाबासो आरेकर, विलास कांबळे,सचिन सिदनाळे,वैशाली पाटील,रेखा कांबळे,उदय झुटाळ यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
