राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या विरोधकांनी आत्मचिंतन करावे : सरपंच चंद्रकांत कांबळे

दत्तवाड : गेल्या २५ वर्षांमध्ये आमदार, खासदारांनी जो विकास केला नाही तो गेल्या पाच वर्षांमध्ये आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केला आहे.ही तुलना विरोधकांनी पाहावी आणि आरोप करताना थोडे आत्मचिंतन करावे, कोणत्याही विकास कामाचे भांडवल नसताना विरोधक आमदार यड्रावकर यांच्यावर आरोप करीत आहेत,हा बालिशपणा ही जनता खपवून घेणार नाही.दतवाडच्या इतिहासात पहिल्यांदाच ३८ कोटी रुपयांची विकास कामे झाली आहेत.आज पर्यंत कोणताही आमदार मागासवर्गीय जनतेच्या सुखदुःखात सहभागी झाला नाही,मात्र आमदार यड्रावकर हे नेहमीच मागासवर्गीय समाजाच्या सुख – दुःखात सामील होऊन त्यांना विकास मार्गावर नेत आहेत.या विकास कामाचे पर्व पुढे सुरू ठेवण्यासाठी त्यांना पुन्हा विधानसभेत पाठवण्याची संधी तुमच्या मताच्या रूपाने पूर्ण करा,असे आवाहन सरपंच चंद्रकांत कांबळे यांनी व्यक्त केले.

 

 

 

दत्तवाड येथे राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांची प्रचार सभा बौद्ध समाज मंदिर परिसरात संपन्न झाली. यावेळी बौद्ध समाजातील लाडक्या बहिणींनी आमदार यड्रावकर यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले.यावेळी सरपंच कांबळे बोलत होते. प्रारंभी स्वागत बबन चौगुले यांनी केले.यावेळी छत्रतपी ग्रुपचे प्रमुख प्रमोददादा पाटील,बहुजन विकास आघाडीचे नेते रणजित पाटील यांनी आपल्या मनोगतातून आमदार यांच्या विकास कामाचा आढावा घेतला.

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यात केलेल्या विकासाचा आढावा मांडला व पुन्हा विकास कामे करण्याची संधी आपल्या मताच्या रुपातून निर्माण करून देण्याचे आवाहन केले.

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सतीश मलमे,हरिश्चंद्र पाटील,मोहन माळगे,संभाजी गोते,सरपंच चंद्रकांत कांबळे,मातंग सामाजाचे अध्यक्ष खंडू भोरे,उमेश आवळे,उपसरपंच संजय पाटील,डी.एन.सिदनाळे,राजगोंडा पाटील,बी.वाय.शिंदे,ए.सी.पाटील,नूर काले, नटराज माळगे,अकबर काले, अशोक टाकवडे,ॲड.सुरेश पाटील, लाला मांजरेकर,अशोक चाळनाईक, आप्पा कांबळे,चंद्रकांत बिरणगे,राजू केंगार,अनिता कडाके,कस्तुरी माळगे, शालन कांबळे,चिंगुताई ठोकळे, राधाबाई कांबळे,माला पांढरे यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

🤙 8080365706