कोल्हापूर : परिवर्तन महाशक्ती व स्वाभिमानी पक्षाचे अधिकृत उमेदवार डॅा.सुजित मिणचेकर यांच्या प्रचारार्थ हुपरी येथे जाहीर सभा घेण्यात आली.
चांदीनगरी म्हणून ओळखल्या जाणा-या हुपरी मध्ये अनेक धडी कामगार व चांदी व्यावसायीकांचे प्रश्न प्रलंबित आहेत.

छत्रपती शाहू महाराजांनी पाया रचलेल्या या चांदीनगरीला आज सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे व चांदी व्यवसायामध्ये नवीन तंत्रज्ञान न आल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून व्यापारी, छोटे -मोठे उद्योजक , शेतमजूर , कामगार , शेतकरी, असंघटित कामगार यांच्यासाठी प्रयत्न करणार आहे.
