साळोखेनगर परिसरातील मतदार महाविकास आघाडीच्या पाठीशी

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील साळोखेनगर प्रभागातील चव्हाण कॉलनी, मोहिते कॉलनी आणि पार्वती पार्क परिसरातील नागरिकांशी सतेज पाटील यांनी संवाद साधला. यावेळी महाविकास आघाडीला सकारात्मक वातावरण असून विकासकामांच्या जोरावर ऋतुराज संजय पाटील यांच्या विजयाची खात्री प्रखरपणे जाणवली. असे मत सतेज पाटील यांनी व्यक्त केले.

 

 

सामाजिक कार्यकर्ते धीरज पाटील, विनोद पाटील, ऍड. शिवाजीराव राणे, रमेश पाटील यांच्यासह प्रभागातील महिला, नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते.

🤙 8080365706