इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ भव्य झंझावात जाहीर सभा घोरपडे नाट्यगृह चौक येथे संपन्न झाली. या सभेला केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह,धैर्यशील माने, प्रकाशआण्णा आवाडे, भाजपा विधानसभेच्या निरीक्षक आमदार शशिकला जोल्ले, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी तसेच हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार अशोकराव माने उपस्थित होते.

या जाहीर सभेत अमित शाह यांनी आपल्या भाषणातून महायुतीच्या सरकारच्या प्रगतीशील धोरणांची आणि इचलकरंजीसाठी असलेल्या विकासात्मक योजनांची माहिती दिली. त्यांनी राहुल आवाडे यांच्या नेतृत्वात इचलकरंजी विधानसभा क्षेत्रात होणाऱ्या सर्वांगीण विकासाची शाश्वती दिली. केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांनी इचलकरंजीच्या व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्राच्या प्रगतीसाठी केंद्र सरकारकडून पाठिंबा मिळवण्याचे आश्वासन दिले आणि महायुतीच्या सरकारच्या योजनांचा लाभ इचलकरंजीच्या नागरिकांना कसा होईल हे स्पष्ट केले.
यावेळी जनता बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे, मोश्मी आवाडे, महेश जाधव, भाजप चे ग्रामीण कोल्हापूर पूर्व जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने, आर पी आय चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, भाजप शहराध्यक्ष पै. अमृतमामा भोसले, ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, शहाजी भोसले, मिश्रीलाल जाजू, विठ्ठलराव डाके, शिवसेना शहराध्यक्ष भाऊसो आवळे, प्रकाश मोरे, तानाजी पोवार, सुनील पाटील, महेश पाटील, ताराराणी महिला आघाडीच्या अध्यक्षा उर्मिला गायकवाड, अंजली बावणे, ताराराणी कार्याध्यक्षा नजमा शेख, भाजप महिला अध्यक्षा अश्विनी कुबडगे, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष वैशाली डोंगरे, महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मतदारसंघातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
