राजेंद्र पाटील यड्रावकरांना टाकळीवाडीतून मोठे मताधिक्य देणार : बाबासो वनकोरे

टाकळीवाडी :शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर हे कुठेही कमी पडले नाहीत,त्यांनी जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तालुक्यातील रुग्णालय मजबुत केली,यासह शिरोळ तालुक्यात २ हजार कोटी रुपयांचा निधी प्रथमच आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्राकर यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच आला, यातच आमदार यड्रावकर यांच्या कामाची पोहोच पावती पहायला मिळते, त्यामुळे आमदार यड्रावकर हे कामाचे व्यक्ती आहेत,त्यामुळे त्यांना निवडून आणण्यासाठी टाकळीवाडीतून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार माजी सरपंच बाबासो वनकोरे यांनी केला.

 

 

टाकळीवाडी येथे राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या जनसंवाद यात्रेनिमित्त गावातून प्रचार फेरी काढण्यात आली.हलगीचा कडकडाट आणि धनगरी ढोल वादनाने गावातील प्रमुख मार्गावरून रॅली संपन्न झाली. यानंतर सभा संपन्न झाली.यावेळी वनकोरे बोलत होते.यावेळी केंदबा कांबळे यांनीही आमदार यड्रावकर यांच्या विकास कार्याचा आढावा घेतला.

यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख सतिश मलमे,छत्रपती ग्रुपचे प्रमोददादा पाटील,सरपंच मंगल बिरणगे,तुकाराम चिगरे,भरत पाटील,कुशाल कांबळे, बाजीराव गोरे,वसंत गोरे,धनपाल कोथळी,भरत निर्मळे,बाहुबली परीट, शितल बस्तवाडे,केंदबा कांबळे,भरमू बदामे,बजरंग गोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706