इचलकरंजी: आमदार राजूबाबा आवळे हे हातकणंगले मतदारसंघाच्या विकासासाठी झटणारे सर्वांना सोबत घेत विकास करणारे कर्तृत्वशील युवा नेतृत्व आहे. कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत करून जोमाने प्रचार करीत त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे. राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे.महायुतीचा पराभव करण्याचा निर्णय राज्यातील जनतेने घेतला आहे.भाजपाने देशातील बड्या उद्योगपतींचे कर्ज माफ करून त्यांचे हित पाहिले आहे.शेतकऱ्यांचे ,सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या प्रगतीसाठी भाजपा सरकारने चांगले निर्णय घेतलेले नाहीत.त्यांना सत्तेपासून दूर ठेवा असे आवाहन कर्नाटक चे उद्योगमंत्री डॉ.एम.बी.पाटील यांनी केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार राजूबाबा आवळे यांच्या प्रचारार्थ तिळवणी येथे आयोजित जन आशीर्वाद पदयात्रे प्रसंगी मंत्री पाटील बोलत होते.यावेळी पक्ष निरीक्षक डॉ.साके शैलजानाथ ,के.बाबुराव(आंध्र प्रदेश),दयानंद पाटील,शशांक बावचकर, तौफिक मुलाणी प्रमुख उपस्थित होते.प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस अभिवादन करण्यात आले.
गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या पदयात्रेचे ग्रामस्थांनी उस्फुर्त स्वागत केले.आभार विजय कदम यांनी मानले.यावेळी सुकुमार चव्हाण,सुंदर माने,शीतल रणदिवे,विठ्ठल कुंभार,विजय कदम,शशिकांत कुटवाडे,निलेश गायकवाड,नवनाथ कांबळे,शीतल गायकवाड,रफिक मुजावर,दिलावर एकसंबे,नवरंग चव्हाण,शंकर वड्ड,संजय आवळे,राजू चौगुले उपस्थित होते.
रुई येथेही भव्य पदयात्रा निघाली.यावेळी बाबासो मकुभाई ,रामचंद्र मुरचिट्टे,कुमार आवटे,माजी उपसभापती अजीम मुजावर,राजू बेनाडे,पोपट पवार,सदाशिव पवार,पांडुरंग जाधव,तानाजी जाधव उपस्थित होते.साजणी येथील पदयात्रेत ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
फोटो ओळी – तीळवणी येथील पदयात्रे प्रसंगी कर्नाटक चे उद्योगमंत्री डॉ.एम.बी.पाटील यांनी मार्गदर्शन केले.यावेळी डॉ.साके शैलाजनाथ,आमदार राजू आवळे,शशांक बावचकर, तौफिक मुलाणी,भगवान जाधव उपस्थित होते.