कोल्हापूर: बांबवडे (ता.शाहूवाडी) येथे भारतीय दलित महासंघाचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी भारतीय दलित महासंघाच्या वतीने जनसुराज्य शक्तीला जाहीर पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.
भारतीय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक गौतम कांबळे यांनी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेतून सामाजिक न्यायाची भूमिका बजावून भारतीय दलित महासंघाच्या माध्यमातून प्रेरणादायी कार्यकर्ते समाजामध्ये निर्माण केले. याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. तसेच लोकशाहीच्या माध्यमातून नवनवे काहीतरी निर्माण करूया तुमच्या सर्वांशी निर्माण झालेला जिव्हाळा आणि प्रेमाचं नातं संघटनेच्या माध्यमातून असेच यापुढे राहूदे असे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी यावेळी सांगितले…
लोकशाहीची ताकद मजबूत करण्यासाठी भारतीय दलित महासंघ आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहणार अशी ग्वाही भारतीय दलित महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी दिली.
भारतीय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक गौतम कांबळे यांनी भारतीय दलित महासंघाच्या माध्यमातून स्वाभिमानी प्रत्येक कार्यकर्ता घडवला तो प्रत्येक कार्यकर्ता जनसुराज्य शक्तीला बळ देणारा ठरेल असे महासंघाचे युवानेते अनिरुद्ध कांबळे यांनी सांगितले…
यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक करणसिंह गायकवाड (सरकार),कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर),जनसुराज्य शक्तीचे प्रवक्ते ॲड.राजेंद्र पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील,कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबा लाड,माजी उपसभापती शंकर बारगीर – पाटील,शाहूवाडी तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष रंगराव खोपडे (आप्पा),महादेवराव पाटील (आण्णा) यांच्यासह भारतीय दलित महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.