राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी साधला राजापूरवाडीतील मतदारांशी संवाद

राजापूरवाडी : शिरोळ तालुक्याचा विकास अधिक गतिमान करण्यासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पुन्हा विधानसभेत पाठवण्याची वेळ आली आहे.तालुक्याच्या विकासासाठी सर्वाधिक निधी आणणारे हे पहिले आमदार आहेत.राजापूरवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी अडीच कोटी रुपयांचा निधी दिला असल्याने राजापूरवाडीचा कायापालट झाला आहे. त्यामुळे अशा जनतेच्या विकासासाठी झटणाऱ्या नेत्याला राजापूरवाडीतून मोठे मताधिक्य देण्याचा विश्वास सरपंच रावसाहेब कोळी यांनी व्यक्त केला.

 

 

राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राजापूरवाडी येथे मतदारांशी संवाद साधला,यावेळी गावातील प्रमुख मार्गावरून प्रचार फेरी काढण्यात आली. येथील लक्ष्मी मंदिर येथे झालेल्या सभेत सरपंच कोळी बोलत होते.स्वागत वाल्मिक कोळी यांनी केले.यावेळी बहुजन विकास आघाडीचे नेते रणजितसिंह पाटील,छत्रपती ग्रुपचे प्रमुख प्रमोददादा पाटील यांनी आपल्या मनोगतातून आमदार यड्रावकर यांच्या विकास कामाचा आढावा मांडला.

यावेळी उपसरपंच कांचन कोळी,माधुरी टाकारे,बाळासाहेब नाईक,संभाजी गोते,राजू गोते,विजय कदम,संतोष गोते,प्रदीप कोळी,आप्पासो मगदूम, अनिल कोळी,आप्पासो नंदाळे,बापूसो गोते,अरुण गोते,डॉ.संदीप कोळी, उस्मान दानवाडे,सल्लाउद्दीन दानवाडे, अविनाश पाटील,सुरेश पाटील,वैशाली गोते,वाल्मिक कोळी,सारिका गोते, राजश्री गोते,कविता कदम,लता गोते, संगीता कदम,कमल सुतार,लैला कौजलगे,श्रीधर शेडबाळे,अभिजीत कोळी,परशुराम माने,खंडू भोरे,अरुण कांबळे,संगिता व्हसमाने,रविकांत जगताप,उमेश शेडबाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.