आमदार यड्रावकर यांनी चिंचवाडचे रुपडे पालटले : सरपंच जालिंदर ठोमके

चिंचवाड : राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा प्रचार चिंचवाड येथे संपन्न झाला. येथील कॉर्नर चौक मध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी गावातील प्रमुख मार्गावरून प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी गावातील लाडक्या बहिणींनी त्यांचे औक्षण केले. या प्रचार फेरीला गावातून मोठा प्रतिसाद मिळाला.

 

 

 

यावेळी सरपंच जालिंदर ठोमके म्हणाले, चिंचवड गावासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी ५ कोटी ९० लाख रुपयांचा निधी दिला असल्यामुळे चिंचवाड गावचे रुपडे पालटले आहे. गावच्या विकासासाठी लढणाऱ्या अशा नेत्याला पुन्हा विधानसभेत जाण्याची संधी आपल्या मतातून सर्वांनी निर्माण करून द्यावी, असे आवाहन केले.
यावेळी बबन कांबळे, भास्कर कांबळे, राजेंद्र चव्हाण, राहुल पाटोळे, सुदर्शन ककडे यांनी आपल्या मनोगतातून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विकास कार्याचा आढावा घेतला, येणाऱ्या गाणे आहे निवडणुकीतून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा विश्वास दिला.
या सभेस भाजपाचे तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे, अण्णासो ककडे बाळासो चौगुले, प्रमोद उदगाव, विठ्ठल घाटगे, सुरेश चौगुले, अण्णा चौगुले, मारुती गोधडे, प्रकाश पाटील, बबन घाटगे, महावीर मिरजे, संदीप पाटोळे, सुनील चव्हाण, अमर कदम, बाबासाहेब कांबळे, भास्कर कांबळे, लक्ष्मण नाईक यांच्यासह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706