कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ कोरोची येथे हजारे मंडप शेजारी भव्य कॉर्नर सभा घेण्यात आली. भाजप नेते धोंडीराम जावळे, मा. आरोग्य सभापती संजय केंगार, शिवसेना महिला जिल्हा अध्यक्षा वैशाली डोंगरे, कल्लापाण्णा आवाडे जनता सहकारी बँकेचे संचालक अविनाश कांबळे व भाजप नेते ऋषभ जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

मतदारसंघातील विकासाची दृष्टी, स्थानिकांच्या गरजांवर आधारित योजनांची रुपरेषा आणि भविष्यातील दृष्टिकोन मांडला. कोरोची गावच्या सर्वांगीण विकास करण्याची शाश्वती सर्व उपस्थितांना मिळाली.
यावेळी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
