कोल्हापूर : हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजूबाबा आवळे यांच्या प्रचाराचा प्रचार शुभारंभ व कार्यालय शुभारंभ हुपरी शहर ग्रामदैवत अंबाबाई मंदिरातून करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते राजीव किसनराव आवळे, महात्मा फुले मागासवर्गीय सुत गिरणीचे चेअरमन संजय आवळे ,शिवसेना उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान, जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे मानसिंगराव देसाई, पंचायत समिती मा उपसभापती घनश्याम आचार्य,

शिवसेना शहर प्रमुख विनायक विभुते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील गाठ, मा नगरसेवक गणेश वाईंगडे, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री बाहुबली गाठ शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख सौ मिनाताई जाधव माकपचे श्री राजेंद्र शिंदे , पृथ्वीराज गायकवाड, प्रणित मधाळे, नितीन काटकर, बाबासाहेब गायकवाड व महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थित संपन्न झाला.
