चंद्रदीप नरकेंच्या संपर्क दौऱ्याला नागरिकांचा उदंड प्रतिसाद

कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीची चुरस रंगली आहे. कोल्हापूर करवीर मतदारसंघाचे महायुती शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांचा संपर्क दौऱ्याला ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. गोठमवाडी, तांदूळवाडी, गोठे, आकुर्डे, पणुत्रे, आंबर्डे, हरपवडे, निवाचीवाडी, बळपवाडी, पनोरे, मुसलमानवाडी या ठिकाणी चंद्रदीप नरके यांनी संपर्क दौरा केला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. या संपर्क दौऱ्यांना मिळणारा उदंड प्रतिसाद ताकद वाढवणारा आहे,असे मत नरके यांनी व्यक्त केले.

 

 

 

यावेळी महायुतीचे पदाधिकारी, विविध सामाजिक, राजकीय, सहकारी संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे पत्रकार बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.