आमदार यड्रावकर जनतेच्या हृदयातील माणूस : नामदेव थोरवत

घालवाड:आमदार यड्रावकर हे शिरोळ तालुक्यातील प्रत्येक नागरिकाच्या हृदयातील माणूस आहे. घालवाड गावामध्ये अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नव्हता मात्र, आमदार यड्रावकर यांनी पेयजल योजनेच्या माध्यमातून स्वच्छ व निर्मळ पाण्याची सोय केली आहे. गावातील अनेक विकास कामे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मार्गी लावलेली आहेत. सर्व जाती – धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा हा एकमेव आमदार असल्याने त्यांना गावातून त्यांना मोठे मताधिक्य देऊन पुन्हा विकास काम करण्याची संधी उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते नामदेव थोरवत यांनी केले.

 

 

राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ येथील श्री घोलेश्वर मंदिर या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. त्यावेळी गावातील प्रमुख मार्गावरून प्रचार फेरी काढण्यात आली, यावेळी गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी या रॅलीत उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला.
या रॅलीचे श्री घोलेश्वर मंदिर परिसरात सभेत रूपांतर झाले. यावेळी स्वागत सरपंच सुहास खाडे तर प्रास्ताविक सचिन निकम यांनी केले. शिवाजी खोंद्रे यांची मनोगते झाली.
यावेळी सतिश मलमे, मल्लापाण्णा चौगुले, आसमा पटेल, उपसरपंच अभिलाश कांबळे, प्रतापराव नाईक, गजानन मगदूम, प्रेमचंद फडतारे, नामदेव थोरात, मदत मस्के, शिवाजी खोंद्रे, रमेश कदम , भारती कोळी, शोभा कोळी, बाळासो परिट, दिपा थोरवत, जयश्री फडतारे, प्रतिभा जाधव, प्रतिभा परिट, माजी सरपंच इंद्रजित सरनोबत यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार मदन मस्के यांनी मानले.