कनवाडकरांनी केला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विजयाचा निर्धार

कनवाड : राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या प्रचार फेरीत असंख्य पदधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सहभाग घेऊन आमदार यड्रावकर यांच्या विजयाचा निर्धार केला. यावेळी हजरते जलाल मखदूम जहाँनिया जहागस्त सय्यद अहमद बुखारी दर्ग्याचे दर्शन घेतले.

 

 

यावेळी झालेल्या सभेत स्वागत बंडू गौराज यांनी केले.यावेळी शहानवाज पिरजादे यांनी स्वागत गीत गायले. यावेळी निवडणूक निधी म्हणून ११ हजार रुपयांचा धनादेश बाबासो आरसगोंडा यांनी आमदार यड्रावकर यांच्याकडे सुपूर्द केला.प्रास्ताविक मुसा इनामदार यांनी केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुनिल बिरनाळे व कोमल कटावणे यांनी राजर्षी शाहू विकास आघाडीत प्रवेश केला.

यावेळी माजी सरपंच बाबासो आरसगोंडा,सरपंच इरफान बुरान, काकासो जाधव,बडेसाहेब इनामदार, यांनी आपल्या आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विजयाचा निर्धार केला.
यावेळी आमदार यड्रावकर यांनी कनवाड गावासाठी आज पर्यंत ७ कोटी ३३ लाख रुपयांच्या निधीतून गावचा विकास साधला आहे,यापुढेही गांवच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्द राहणार असल्याचे सांगितले.

यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे,मुसा इनामदार,अखिलअली इनामदार,सुरेश नाईक,दादासो खटावणे,अजहर पट्टेकरी,मियासाहेब इनामदार,महमुद इनामदार, किस्मतपाशा इनामदार,शहाजान इनामदार,बाबासो कोळी,मुरलीधर सुतार,शिवबसु गौराज,तैबुदीन इनामदार,आसमा पटेल,प्रथमेश आरसगोंडा यांच्यासह पदाधिकारी प्रसंगी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.आभार अख्तर पटेल यांनी मानले.

🤙 8080365706