गडहिंग्लजमध्ये देवदेवतांचे दर्शन घेत मंत्री मुश्रीफ यांचा प्रचार दौरा

गडहिंग्लज:गडहिंग्लजचे ग्रामदैवत श्री. काळभैरी, श्री. महालक्ष्मी, संत बाळूमामांचे दर्शन घेत मंत्री हसन मुश्रीफ प्रचाराला सुरुवात केली. बुलेट सवारी आणि पायी जात थेट मतदारांशी संपर्क साधला. दिवसभर गडहिंग्लज शहर पिंजून काढले.

 

 

. महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धारासाठी मंत्री मुश्रीफ यांनी जादा निधी द्यावा, अशी गुरव समाजाच्यावतीने मागणी केली. महायुती पुन्हा सत्तेत आल्यास महालक्ष्मीचे भव्य- दिव्य मंदिर आणि परिसर सुशोभीकरणासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली. मंदिर पाहण्यासाठी देशातून, राज्यातून लोक येतील, असे सुंदर मंदिर उभा करू, असेही ते म्हणाले.

रिंगणे मळा येथे बाळूमामा मंदिरात बैठक पार पडली. यावेळी सर्व ताकतीनिशी मंत्री मुश्रीफ यांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून देऊ, अशी ग्वाही मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष आप्पा शिवणे, रमेश रिंगणे, किरण कदम, सुधीर पाटील, दीपक पाटील, सुरेश कोळकी, विठ्ठल भमानगोळ, चंद्रकांत सावंत, अर्चना रिंगणे, अरुण बेल्लद, कृष्णराव वाईंगडे, काडापाण्णा पडदाळे आदी गडहिंग्लज परिसरातील कार्यकर्त्यांनी दिली.

माधव पोटे-पाटील यांच्या घरी धनंजय महाडिक युवा शक्ती कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. कोणत्याही प्रकारचा मतभेद न बाळगता आजरा, गडहिंग्लज परिसरातील युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांचा पालकमंत्री मुश्रीफांना पाठींबा राहील, अशी ग्वाही माधव पोटे-पाटील यांनी दिली. याप्रसंगी युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांचा योग्य तो मानसन्मान राखला जाईल, असे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

गडहिंग्लज अर्बन बँकेचे प्रमुख जितेंद्र नाईक श्री. मुश्रीफ यांना पाठिंबा देताना म्हणाले, बँकेचे सर्व संचालक व सर्व कर्मचारी आपल्या पाठीशी ठाम राहून जास्तीत जास्त मताधिक्य देतील. भीमनगर येथे कार्यकर्त्यांची भेट घेतली. भाजपचे पदाधिकारी प्रीतम कापसे, गुणे गल्ली यांची घरी भेट घेतली. यानंतर राजू खाणगावे, भोसले- गोंधळी समाज, बिलावर वाडा, तेवडे समाज आदी ठिकाणी भेटी दिल्या. कार्यकर्त्यांचा उत्साह व उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. एकूणच मंत्री मुश्रीफ गडहिंग्लज शहर दिवसभर पिंजून काढले.

मराठा समाजाचे आप्पा शिवणे यांचा पाठिंबा
मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष आप्पा शिवणे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना मराठा समाजाचा पाठिंबा जाहीर केला. श्री शिवणे म्हणाले, मराठा योद्धे मनोज जरांगेसाहेब यांनी आदेश दिले आहेत की, जो उमेदवार चांगले काम करतो त्याच्या पाठीशी राहा. म्हणूनच; पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला. हसनसाहेब मुश्रीफ यांच्या कामाचा सपाटा मोठा आहे.

नेमके परिवर्तन कशाचे ?
गडहिंग्लज शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्षा डॉ. बेनिता डायस म्हणाल्या, विशेष म्हणजे १९६२ पासून २०२३ पर्यंत फक्त ५ मेडिकल कॉलेजना मान्यता मिळाली. परंतु; वैद्यकीय शिक्षण खाते मिळताच मुश्रीफसाहेबांनी सव्वा वर्षात ६ मेडिकल कॉलेजना मान्यता मिळवून दिली. देशातील पहिले नॅचरोपॅथी कॉलेज उत्तूर या ठिकाणी सुरू होत आहे. याचा आम्हांला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे देशात त्यांच्यासारखे काम होणे नाही. समरजित घाटगे परिवर्तन करणार म्हणून सगळीकडे सांगत आहेत. आता परिवर्तन करायला त्यांच्याकडे मुद्दा कुठला आहे ? ते नेमकं कशाचे परिवर्तन करणार ? हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे.