कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांना इंडिया आघाडी, महाविकास आघाडी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पुरस्कृत केले असल्याची घोषणा खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीमधील बैठकीत केली.

यावेळी आमदार जयंत आसगावकर, कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे पक्ष निरीक्षक सुखवंतसिंह ब्रार, शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, सुनिल मोदी, काँग्रेसचे शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, दौलत देसाई, राहुल देसाई, दुर्वास कदम, राष्ट्रवादीचे आर. के. पोवार यांच्यासह इंडिया आघाडी व महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
