राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली ; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरु आहे अशातच निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. काँग्रेससह विरोधकांनी आयोगाकडे रश्मी शुक्ला यांच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर यावर आज निर्णय घेत निवडणूक आयोगाने शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय ३ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे उद्यापर्यंत पाठवा अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव यांना आयोगाने दिले आहेत.

 

 

फोन टॅपिंगमुळे विरोधकांनी रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप केले होते. रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवावं अशी मागणी सातत्याने विरोधकांकडून केली जात होती. मुदत संपूनही रश्मी शुक्ला यांना २ वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. याबाबत विरोधकांनी केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांचीही भेट घेतली होती. रश्मी शुक्ला यांच्या कार्यकाळात निष्पक्षपणे निवडणूक पार पडणार नाहीत असा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर आज निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

🤙 8080365706