कोल्हापूर : उबाठा गटाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वडणगे येथील शुभांगी सुनील पवार, यांनी उबाठा गटातून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांची शिवसेना पक्षाच्या महिला सेना जिल्हाप्रमुख पदी (कार्यक्षेत्र- कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर व करवीर विधानसभा) नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांचे चंद्रदीप नरके यांनी स्वागत करून त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उबाठा गटातून उपजिल्हाप्रमुख वंदना पाटील (भूये), धनवंती नरके, तेजस्विनी पाटील, माई बरगे, पूजा मिसाळ, सुप्रिया पाटील, उपजिल्हाप्रमुख अरुणा जाधव, चैत्राली जाधव, सारिका पाटील, सारिका पोवार, इंदुबाई जांभळे, वडणगे सरपंच संगीता पाटील, पन्हाळा तालुकाप्रमुख सर्जेराव मोळे तात्या (कळे), विठ्ठल पाटील (वाळोली), सरदार पाटील (कळे), उप-तालुकाप्रमुख सुनील पवार आदी उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचा मफलर घालून मी सर्वांचे स्वागत केले.
यावेळी शिवसेना करवीर तालुकाप्रमुख कृष्णात पवार, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकार बांधव उपस्थित होते.