राहुल पाटील यांचा बाजारभोगाव पंचायत समिती येथील कार्यकर्त्यांशी संवाद

कोल्हापूर :महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुल पी. एन. पाटील यांनी बाजार भोगाव पंचायत समिती येथील निष्ठावंत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.स्वर्गीय आमदार पी.एन.पाटील यांनी करवीर विधानसभा मतदार संघात प्रत्येक गावात गेल्या १० वर्षात जो विकास झाला नाही तो विकास फक्त ५ वर्षात झाला असे मनोगत सर्वानी व्यक्त केले.

 

 

अशीच विकासकामे स्वर्गीय आमदार पी.एन.पाटील यांच्या माघारी चालू ठेऊन करवीर विधानसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे आश्वासन राहुल पाटील यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना दिले.