कोल्हापूर : राजलक्ष्मीनगर येथील महाडिक गटाचे कार्यकर्ते रमेश चावरे यांनी सतेज पाटील यांच्या उपस्थितीत आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाला पाठींबा वाढत असून हे विजयाच्या दिशेदृष्टीने सकारात्मक पाऊल ठरत आहे. असे मत सतेज पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी नगरसेविका दिपा दिलीप मगदूम, सुयोग मगदूम, मिलिंद पाटील, इंद्रजीत साळोखे, शिवाजी मोरे, दत्ता बामणे, देवेंद्र सरनाईक, वैभव पाटील, शामराव चौगले, रघुनाथ चव्हाण, राणोजी चव्हाण, सुमन पाटील, रोहीणी सोळोखे, महादेव पाटील, अमर सरनाईक, प्रताप जाधव, रवी जाधव यांच्यासह परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.