कोल्हापूर: करवीर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार चंद्रदीप नरके यांचा उमेदवारी अर्ज जोरदार शक्तिप्रदर्शन करत दाखल करण्यात आला. जनतेचा उत्साह हीच, महायुतीची खरी ताकद असे मत धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले.
यावेळी धनंजय महाडिक म्हणाले, मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून केल्या अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे झालेली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजितदादा पवार यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात अनेक महत्वपूर्ण योजना राबवल्या आहेत. त्याचा लाभ सर्व सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात झाला आहे. हीच सर्व सामान्य जनता महायुतीच्या पाठीशी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीचे दहाही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.