कोल्हापूर : हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून अशोक माने यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली.या उमेदवारीसाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष,आमदार डॉ. विनयराव कोरे (सावकार) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा करून हातकणंगले मतदारसंघात महायुतीची अधिकृतरित्या उमेदवारी घोषित केली.
याबद्दल आमदार डॉ. विनयराव कोरे (सावकार) यांचे अशोक माने यांनी वारणानगर येथे भेट घेऊन अभिनंदन केले . तसेच जिल्ह्यातील महायुतीचे नेते खासदार धैर्यशील माने यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक विजयसिंह माने ,भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील, मा.जि.प.सदस्य प्रसाद खोबरे,संतोष ताईगडे, महेंद्र शिंदे,विश्वास माने,राजेंद्र जाधव,दिनेश सनगर,डॉ.अभय यादव,अरविंद माने यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..