कोल्हापूर : राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जात – पात, गट – तट न पाहता कोथळी गावासाठी तब्बल २१ कोटी ७० लाखाचा भरघोस निधी दिला असल्याने कोथळी गावचा कायापालट झाला आहे. या ऋणातून उतराई होण्यासाठी संपूर्ण कोथळी गाव मताच्या रुपातून आमदार यड्रावकर यांना पाठबळ देऊन पुन्हा विधानसभेत पाठवू, असा विश्वास ज्येष्ठ नेते पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक धनगोंडा पाटील यांनी व्यक्त केला.
राजश्री शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी कोथळीसह परिसरातील गावभेटी घेतल्या. यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी कोथळी येथील जागृत देवस्थान मंगेशवर मंदिरात प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी दशरथ काळे, कोथळीचे सरपंच अनमोल करे, उपसरपंच शरद कांबळे, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य भरतेश खवाटे, बाबुराव पाटील, महावीर पतसंस्था संचालक बाहुबली इसराण्णा,लक्ष्मी पतसंस्थेचे अजित पाटील गौंडाप्पा, क्रांतीसमूहाचे नेते देवगोंडा पाटील, राजेंद्र नांदणे, जवाहरचे संचालक गौतम इंगळे, बच्चन धनगर,ग्रामपंचायत सदस्य नितीन वायदंडे, हिदायत नदाफ, तंटामुक्त अध्यक्ष सनी मगदूम, माजी ग्रामपंचायत सदस्य रवी पुजारी, रावसो बोरगावे, महावीर बोरगावे, सागर पुजारी, अमोल पाटील धडेल, सचिन कांबळे, प्रकाश बोरगावे, नामदेव कांबळे, जीवन तिवडे, संतोष तिवडे, रावसाहेब विभुते, जितेंद्र माळी, बबन माळी, गणेश जंगम, अण्णा आंबी, प्रमोद कुंभार, दिलीप कुंभार, भाऊसो मगदूम, प्रकाश पुजारी, उत्तम तिवडे, यश तिवडे, मधुकर तिवडे, संदीप मोरे, अमोल हंकारे, देवल हंकारे, भास्कर फरास सुधीर आवळे यांच्यासह क्रांती समूहातील सर्व पदाधिकारी, गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.