शिरोली दुमाला येथील कार्यकर्त्यांचा चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

कोल्हापूर: शिरोली दुमाला येथील तुळशी सहकार समूहाचे नेते व सर्व पदाधिकारी, लोकशाही ग्रामविकास आघाडीचे नेते व सर्व पदाधिकारी तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेचा मफलर घालून माजी. आमदार चंद्रदीप नरके यांनी सर्वांचे स्वागत केले.

 

 

यावेळी ग्रा.पं. शिरोली दुमालाचे मा.डे. सरपंच सरदार शिवाजी पाटील, तुळशी दूध संस्थेचे चेअरमन सर्जेराव सुभेदार, धुळोबा पाटील, संजय पाटील, ज्ञानदेव पाटील, यशवंत परीट, बाळू परीट, गणपती चौगुले, सुभाष पाटील, कृष्णात साळोखे, माधव तोडकर यांच्यासह त्यांचे सहकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांमध्ये अरुण पाटील, वैशाली परीट, गायत्री सुभेदार, सागर घोटणे या चार विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी देखील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

याचबरोबर ज्ञा. स. सोसायटीचे संचालक रामचंद्र पाटील, सर्जेराव पाटील, तानाजी पाटील, अरुण देशमुख, उत्तम सारंग, तानाजी कुंभार, गजानन सुभेदार, दादासो देसाई, नितीन पाटील, सदाशिव पोवार, रघुनाथ कांबळे, मारुती पाटील, संदीप पोवार, दिलीप देशमुख, यांच्यासह त्यांचे सहकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.