कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडून दुसऱ्या यादीमध्ये शिरोळ विधानसभा मतदारसंघातून गणपतराव पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून मदन कारंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली तर चंदगड विधानसभा मतदारसंघातून नंदाताई बाभुळकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तीन जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडे तीन जागा आणि शिवसेना ठाकरे गटाकडे दोन जागा राहतील अशी चिन्हे आहेत.
इचलकरंजी मध्ये राहुल आवाडे यांच्या विरोधात मदन कारंडे यांची उमेदवारी राष्ट्रवादीकडून जाहीर झाली आहे. महाविकास आघाडी कडून कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ मतदारसंघामध्ये उमेदवार निश्चित झाले आहेत
राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीमधील उमेदवार
1. 16 एरंडोल – सतीश अण्णा पाटील
2. 111 गंगापूर – सतीश चव्हाण
3. 135 शहापूर – पांडुरंग बरोरा
4. 243 परांडा – राहुल मोटे
5. 230 बीड- संदीप क्षीरसागर
6. 44 आर्वी – मयुरा काळे
7. 116 बागलान – दीपिका चव्हाण
8. 119 येवला – माणिकराव शिंदे
9. 120 सिन्नर – उदय सांगळे
10. 122 दिंडोरी – सुनीता चारोस्कर
11. 123 नाशिक पूर्व – गणेश गीते
12. 141 उल्हासनगर- ओमी कलानी
13. 195 जुन्नर – सत्यशील शेरकर
14. 206 पिंपरी – सुलक्षणा शीलवंत
15. 211 खडकवासला – सचिन दोडके
16. 212 पर्वती – अश्विनीताई कदम
17. 216 अकोले – श्री अमित भांगरे
18. 225 अहिल्या नगर शहर- अभिषेक कळमकर
19. 254 माळशिरस- उत्तमराव जानकर
20. 255 फलटण – दीपक चव्हाण
21. 271 चंदगड – नंदिनीताई भाबुळकर कुपेकर
22. 279 इचलकरंजी – मदन कारंडे