कोल्हापूर : आज भारतीय जनता पार्टीच्यावतीने नागाळा पार्क येथील कार्यालयात करवीर विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची प्रचार नियोजन संदर्भात बैठक पार पडली. संपूर्ण भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते एकजुटीने काम करतील, आमदारकीचा गुलाल चंद्रदीप नरके यांनाच लागेल, असे राज्यसभा खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडीक यांनी सांगितले. या वेळी सर्व मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. धनुष्यबाण चिन्हावर चंद्रदीप नरके हेच विजयी होतील हा विश्वास प्रत्येकाने व्यक्त केला.
यावेळी बैठकीला खासदार धनंजय महाडिक, चंद्रदीप नरके,सुरेश हाळवणकर , के. एस. अण्णा चौगुले, पी.जी.शिंदे , डॉ.गुरव, कोल्हापूर भाजपा अध्यक्ष नाथाजी पाटील, भाजपा करवीर विधानसभा प्रमुख हंबिरराव पाटील, समन्वयक भिकाजी जाधव, पन्हाळा भाजपा अध्यक्ष मंदार परितकर, करवीर भाजपा अध्यक्ष दत्तात्रय मेडशिंगे, गगनबावडा भाजपा अध्यक्ष स्वप्नील शिंदे यांच्यासहित भाजपा कोल्हापूर जिल्हा व भाजपा करवीर विधानसभा मतदार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.