दिल्ली : विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राजधानी दिल्लीत काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीची दुसरी बैठक पार पडली. विदर्भ मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला दिल्यामुळे राहुल गांधी नाराज आहेत . काँग्रेसच्या नेत्यांनी योग्य पद्धतीने वाटाघाटी केला नाहीत अशा स्पष्ट शब्दात राहुल गांधीनी बैठकीत मत व्यक्त केले.
महाविकास आघाडीत सर्व काही ठीक आहे आम्ही एकत्र निवडणूक लढवू महाविकास आघाडीत कोणतीच अडचण नाही, ती तर महायुतीत आहे. आम्ही सगळे एकत्र आहोत, ही निवडणूक आम्ही एक दिलाने लढवू आणि महाराष्ट्रात सरकार स्थापन करू असे काँग्रेसचे निवडणूक प्रभारी रमेश चेन्नथीला यांनी नमूद केले.
या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे , लोकसभा विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी , राष्ट्रीय संघटन महासचिव खा. के. सी. वेणुगोपाल यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस मुख्यालयात पार पडली.