कोल्हापूर : नगररचना विभाग, विभागीय कार्यालय क्र.3, राजारामपुरी घरफाळा विभाग, पाणी पुरवठा विभागामध्ये सकाळी 10.30 वाजता अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे यांनी अचानक भेट दुऊन या सर्व कार्यालयांची तपासणी केली. या सर्व विभागातील 69 पैकी 41 कर्मचारी जागेवर कार्यालयात वेळेमध्ये उपस्थित नसलेचे निदर्शनास आले. या सर्व कर्मचा-यांची अर्धा दिवसाची रजा मांडण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त यांनी यावेळी दिले.
तसेच नगररचना विभागामध्ये तपासणी करताना प्रत्येकाच्या टेबलावरील प्रलंबित बांधकाम, भोगवटा प्रमाणपत्र व इतर प्रकरणांची माहिती घेऊन आढावा घेतला. यामध्ये 113 बांधकाम व 72 भोगवटा प्रमाणपत्रांच्या फायली प्रलंबित असल्याने निदर्शनास आले. याबाबत संबंधीत अधिकारी व सर्व्हेअर यांना कारणे दाखवा नोटीसा देण्यात आल्या आहेत. यावेळी रवका अधिकारी प्रशांत पंडत उपस्थित होते.