कोल्हापूर: राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी यड्रावकर लॉन,क्रांती चौक,केपिटी चौक ते शिरोळ अशी महारॅली काढण्यात आली.उमेदवारी अर्ज मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करून दाखल करण्यात आला.सकाळी नऊ वाजल्यापासून शिरोळ विधानसभा मतदारसंघातून कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली.
कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता.आपली निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर आहे,विकासाचा अजेंडा घेऊन आपण पुढे जात आहोत, असे प्रतिपादन यड्रावकर यांनी केले.
यावेळी खासदार धैर्यशील माने,माजी खासदार संजय मंडलिक,शिरोळ नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने,पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन पी.एम.पाटील,पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश पाटील टाकवडेकर,रवींद्र माने,उद्योगपती विनोद घोडावत,शरद साखर कारखान्याचे संचालक सुभाषसिंग रजपूत,पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक जयपाल कुंभोजे,बहुजन विकास आघाडीचे नेते रणजीत पाटील,जिल्हा नियोजन समिती सदस्य दशरथ काळे,विश्वास बालीघाटे,सय्यद पटेल,दादासो पाटील,शाहीन मोमीन,दादेपाशा पटेल, मल्लाप्पा चौगुले,सतीश मलमे,रमेश भुजुगडे,चंद्रकांत जोंग,मिलिंद शिंदे,मुनीर शेख,शाबगोंडा पाटील,फारूक जमादार,इकबाल मेस्त्री,सुरेश शहापुरे,गुरुदत्त साखर कारखान्याचे संचालक बबन चौगुले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.