मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चंद्रदीप नरके यांनी शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून ए.बी. फॉर्म स्वीकारला

कोल्हापूर : मंगळवारी 22 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर झालेल्या शिवसेनेच्या अधिकृत पहिल्याच विधानसभा उमेदवार यादीमध्ये माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली.

 

 

त्या अनुषंघाने काल बुधवारी, 23 ऑक्टोबर 2024 बाळासाहेब भवन, मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याहस्ते शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून चंद्रदीप नरके यांनी ए.बी. फॉर्म स्वीकारला. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे उपस्थित होते. माझ्यावर दाखवलेला हा विश्वास मी सार्थ ठरवेन आणि करवीरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहीन.असा विश्वास व्यक्त केला.