समरजीत घाटगे यांनी विधानसभा निवडणुकीचा फॉर्म भरत परिवर्तनाच्या लढाईचा शंख फुंकला

कागल : समरजीत घाटगे यांनी विधानसभा निवडणूक २०२४ चा फॉर्म भरत या कागल, गडहिंग्लज आणि उत्तूरच्या परिवर्तनाच्या लढाईचा शंख फुंकला आहे. ही लढाई फक्त समरजितसिंह घाटगे किंवा घाटगे घराची नसून ही लढाई समस्त मतदार बांधवांची आहे.

 

 

 

यावेळी घाटगे म्हणाले, कागल, गडहिंग्लज आणि उत्तूरच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटीबद्ध असून आज नागरिकांनी दिलेला भरभरून प्रतिसाद आणि त्यांचे प्रेम पाहून विजयश्री आपलीच असेल, यात शंकाच नाही.