परिते येथील कार्यकर्त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून शिवसेनेत प्रवेश

कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. परितेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व काँग्रेस गटातून कार्यकर्त्यांनी महायुतीच्या मेळाव्यात चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीत  शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

 

परिते येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून महालक्ष्मी दूध संस्थेचे संस्थापक अरुण ज्ञानदेव पाटील आणि काँग्रेस गटातून मा.सरपंच सुभाष मारुती पोवार यांच्यासह त्यांचे सहकारी व कार्यकर्ते यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.मा. आमदार चंद्रदीप नरके यांनी शिवसेनेचा मफलर घालून त्यांचे स्वागत केले.

🤙 8080365706