विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनो जोमाने कामाला लागा : सदाभाऊ खोत

कोल्हापूर : 2024 च्या वाळवा आणि शिराळा विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना रयत क्रांती संघटना मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एस.के इंटरनॅशनल सैनिक स्कूल रेठरे धरण येथे बैठक संपन्न झाली.

 

 

कार्यकर्त्यांशी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, की वाळवा शिराळा, इस्लामपूर मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी गाव निहाय, वॉर्ड निहाय बैठकीचे आयोजन करा. आपले महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येणार आहे. पुढे लगेच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जाहीर होणार आहेत नागरिकांच्या अडीअडचणी समजून घ्या. विविध विकास कामे केलेली लोकांना पटवून सांगा. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपले स्वतंत्र उमेदवार उभा करायचे आहेत. मी कार्यकर्त्यांना ताकद देणार आहे. जोमाने कामाला लागा आपणास शिराळा आणि वाळवा – इस्लामपूर विधानसभेचे दोन्ही आमदार निवडून आणायचे आहेत.

यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक जाधव रयत क्रांती संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष किरण उतळे, माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार पाटील, शशिकांत शेळके, अमोल पाटील (दादा), डी के, पाटील रयत क्रांती संघटना वाळवा तालुकाध्यक्ष अमोल पाटील, रयत क्रांती संघटनेचे ज्येष्ठ नेते सुनील सावंत (दादा),जयवंत पाटील (आप्पा),रयत क्रांती वाहतूक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बजरंग भोसले रयत क्रांती संघटनेचे अल्पसंख्यांक अध्यक्ष मोहसीन पटवेकर वाळवा गावचे रयत क्रांती संघटनेचे युवा अध्यक्ष शशिकांत शेळके रयत क्रांती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण गावडे, रयत क्रांती संघटनेचे सांगली जिल्हा सरचिटणीस संदीप फार्णे (भाऊ) रयत क्रांती कामगार आघाडी संदीप पाटोळे तुजरपुर ग्रामपंचायतचे सदस्य रोहन बाबर रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष लालासो धुमाळ, रयत क्रांती संघटनेचे राजेंद्र पाटील, रयत क्रांती संघटनेचे इस्लामपूर शहराध्यक्ष सर्फराज डाके हेमंत मुळीक (दादा) तानाजी जगताप (नाना), धनाजी हुबाले, राकेश भोसले हेमंत पाटील (दादा) गणेश पाटील इत्यादी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545