कोल्हापूर : बाजारभोगाव पंचायत समिती मतदारसंघक्षेत्रात चंद्रदीप नरके यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. तसेच विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शेकडो कोटींचा निधी खेचून आणत आपण केलेली कामेच, आपल्याला लोकांसमोर घेऊन जायची आहेत. आपण केलेल्या विकास कामांच्या जोरावरच आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे. यासोबतच यावेळी निवडणुकांसंदर्भात विविध गोष्टींवर मार्गदर्शन केले.
यावेळी बाजारभोगाव जिल्हा परिषद मतदारसंघ कार्यक्षेत्रातील शिवसेनेचे पदाधिकारी, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी सदस्य, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, महिला वर्ग, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार बांधव आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.