समरजित घाटगेंच्या हस्ते व्हन्नूर येथील प्रवेशद्वार कमानीचा उद्घाटन समारंभ  संपन्न

कोल्हापूर: कागल तालुक्याचे माजी आमदार आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दौलतराव निकम यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून व्हन्नूर फाटा या ठिकाणी त्यांच्या नावाचे प्रवेशद्वार साकारण्यात आले आहे.

 

 

आज या प्रवेशद्वार कमानीचा उद्घाटन सोहळा आणि जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा समरजित घाटगे यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थितांशी
घाटगे यांनी संवाद साधताना दौलतरावजी निकम यांचे कार्य आणि विचार नेहमीच आमच्यासाठी प्रेरणादायी राहिले असून त्यांच्याच विचारांना पाईक मानून आम्ही काम करत आलो आहोत, असे प्रतिपादन समरजित घाटगे यांनी केले. यासह पुरस्कार्थिंना सन्मानित करत त्यांचा गौरव करण्यात आला.

🤙 8080365706