चंद्रदीप नरकेंच्या नेतृत्वाखाली शिंगणापूरातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

कोल्हापूर: शिंगणापूर येथील सामाजिक कार्यकर्ते अभिजीत सुरेश पाटील, त्यांचे सहकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी आज चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

 

यावेळी चंद्रदीप नरके म्हणाले, “माझ्या भगिनींची संख्या सर्वाधिक होती. पक्षप्रवेशाच्या माध्यमातून, माझ्या नेतृत्वावर दाखवला जाणारा विश्वास जबाबदारी वाढवणारा असला तरी त्यापेक्षा कित्येक पटीने ताकद वाढवणारा आहे.” या वेळी शिंगणापूर आणि परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.