कोल्हापूर: कुरुंदवाड शहरातील ११ कोटी ९ लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन विकासाची गंगा घराघरापर्यंत पोहोचवली आहे.शिरोळ तालुक्यातील सर्वधर्मीयसमाज बांधवांना एकत्रित घेऊन विकासाची गंगा घराघरापर्यंत पोहोचवली आहे.कुरुंदवाड शहराला ऐतिहासिक वारसा आहे.शहरातील मुलांना क्रीडा क्षेत्रात पाठबळ देण्याचे दृष्टीने शहरात तालुक्याचे क्रीडा संकुललाची उभारणी करणार असल्याचे सांगितले.
यावेळी मुख्याधिकारी टीना गवळी,माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील,रामचंद्र डांगे,दादासाहेब पाटील,माजी नगराध्यक्ष सुनील चव्हाण,सुनील कुरुंदवाडे,रामदास मधाळे,वकील विजय जमदग्नी,श्रीकांत माळी,बाळासाहेब कुंभार,इकबाल पटवेगार,दादासाहेब पाटील,आनंद कुंभार,महिपती बाबर,प्रदीप बोरगे,उदय डांगे,रमेश भुजूगडे,जय कडाळे,उदय डांगे,तानाजी आलासे,दीपक गायकवाड,रामभाऊ मोहिते,फारूक जमादार,महावीर पाटील,अक्षय आलासे,सुरेश जिंदगे,राजेंद्र घारे,शब्बीर भिलवडे,रविकिरण गायकवाड,चंद्रकांत पवार,उमेश कर्नाळे उपस्थित होते