कुंभोज येथे ऐतिहासिक दसरा महोत्सव संपन्न वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या हस्ते सीमाउल्लंघन

कुंभोज (विनोद शिंगे)
कुंभोज तालुका हातकणंगले येथील ऐतिहासिक परंपरा असणारा दसरा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला .गेल्या पन्नास वर्षापेक्षा जास्त या गावांमध्ये सीमा उल्लंघन करण्यापूर्वी तीन तास गावातील सर्व टू व्हीलर, फोर व्हीलर व मोठे वाहनधारक तसेच बैलगाडी, घोडा गाडी सर्वजण संपूर्ण कुंभोज मध्ये दसरा चौकातून आपल्या प्रत्येक वाहनाची पाच फेऱ्या मारतात. हे पाहण्यासाठी कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी पोहोचलेले असतात यावेळी हातकणंगले पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत कुंभोज यांचे सुंदर नियोजन होते.

 

दसरा राऊड झाल्यानंतर कुंभोज गावची परंपरा असणारे गावचे पाटील बाबासाहेब पाटील यांच्या घरातून संवाद मिरवणुकेने सीमा उल्लंघन कार्यक्रमाला सुरुवात होते .यावेळी वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील युवा नेते आदित्य पाटील सरपंच सौ स्मिता चौगुले, उपसरपंच अशोक आरगे, जव्हार कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी, प्रकाश पाटील,बावडा संचालक सुरेश तानगे,अमोल गावडे, अनिल कोरे, सुदर्शन चौगुले,तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत एसटी स्टँड परिसरात भव्य मिरवणुकीने येऊन सीमा उल्लंघन केले जाते.

कुंभोज तालुका हातकणंगले येथील ऐतिहासिक दसरा महोत्सव पाहण्यासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून हजारो नागरिक कुंभोज येथे दाखल झाले होते.सायंकाळी सहा वाजता सीमा उल्लंघन वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील व आदित्य पाटील यांच्या पूजनाने झाले. यावेळी कुंभोज परिसरातील वातावरण धार्मिक बनले होते.