आगामी विधानसभा निवडणुकीत माझ्या पाठीशी राहा- आमदार राजूबाबा आवळे

कुंभोज (विनोद शिंगे)

रेंदाळ येथे संजय गांधी निराधार योजनेचे मंजूर आदेश वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला हातकणंगले विधानसभा आमदार राजूबाबा आवळे यांनी उपस्थित राहून लाभार्थ्यांना मंजूर आदेश वाटप केले. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत २५ हजार नागरिकांना आमदार राजूबाबा आवळे यांच्या माध्यमातून लाभ मिळाला आहे.

 

 

भविष्यातही लाभार्थ्यांना हा लाभ मिळवून देण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. तसेच वाढत्या महागाईचा विचार करता आपले महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर हा हप्ता ४००० रूपये करणार आहोत. असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

उपस्थित सर्व जेष्ठांशी यावेळी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत विजय करण्याचे आव्हान आमदार राजूबाबा आवळे यांनी उपस्थित यांना केले तसेच सगळ्यांचा आशिर्वाद घेतला.यावेळी महिला, नागरिक, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706