पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘बंजारा विरासत’ म्युझियमचे उद्घाटन

वाशीम : बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे उभारण्यात आलेल्या ‘बंजारा विरासत’ या म्युझियमचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोहरादेवी येथील आई जगदंबा मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. तसेच त्यानंतर संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज समाधीला भेट देऊन दर्शन घेतले.

यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राजीव रंजन सिंग केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वाशिम -यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, कृषीमंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते.