राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय …

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी (दि.4) राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत 41 विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

 

 

राज्य सरकारचा  मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

 * राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ

 * महसूल न्यायाधीकरणाच्या अध्यक्ष व सदस्यांसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवणार

 * दौंड येथे बहुउद्देशीय सभागृह नाट्यगृहासाठी शासकीय जमीन

 * त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामास गती देणार

 * टेंभू उपसा सिंचन योजनेस स्व अनिल भाऊ बाबर यांचे नाव

* पूर्णा नदीवर दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामांना गती देणार; सिल्लोड मधील जमिनीला सिंचन

 * प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षाचा तुरुंगवास, एक लाख दंडाची तरतूद

 * राज्यातील खेळाडूंसाठीच्या पारितोषिकांचा रकमेत वाढ

 * राज्यातील आणखी १०४ आयटीआय संस्थांचे नामकरण

 * संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबवणार

 * लहान जलविद्युत प्रकल्पासाठी बांधा वापरा हस्तांतरण धोरण

* कोकण पुणे विभागासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन कंपन्या

 * महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना

 * राज्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र

* जैन समाजासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ

* महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ

* आजरा तालुक्यातील वेळवट्टी, गवसे, घाटकरवाडी बंदिस्त पाईपलाईन टाकणार

* बंजारा, लमाण तांड्यात ग्रामपंचायतसाठी लोकसंख्येची अट शिथिल

* कागल येथील सागावमध्ये नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय

* महाराष्ट्र सागरी मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार

* कुडाळ तालुक्यातील डोंगरेवाडीत साठवण तलाव

* बारी, तेली, हिंदू खाटीक, लोणारी समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे

* गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवणार; २६०४ कोटीस मान्यता

* राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करणार. १ लाख ६० हजार कोटींचे गुंतवणूक अपेक्षित

* उच्च तंत्रज्ञानावर आधारित अतिविशाल प्रकल्प योजनेत सुधारणा; अधिकाधिक प्रकल्पांना प्रोत्साहन

*राळेगण सिद्धी येथील उपसा सिंचन योजनेचे सक्षमीकरण

*शिरोळ तालुक्यातील गावांमध्ये भूमिगत चर योजना राबवणार

*बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान योजना

*सोलापूर ते मुंबई हवाई मार्गासाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग देणार

*वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसायरोध भत्ता देणार

*डेक्कन कॉलेज, गोखले संस्था, टिळक महाराष्ट्र मधील कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना

* वडाळा सॉल्ट पॅनमधील भूखंड शैक्षणिक कारणांसाठी

* रमाई आवास, शबरी आवास योजनेतील घरकूल अनुदानात वाढ