शिक्षण पद्धती सोबत आर्थिक साक्षरता ही महत्त्वाची आहे : डॉ.चेतन नरके

कोल्हापूर : एशियन कंट्रीज मध्ये उदाहरणार्थ जपान सारख्या देशात मुलांना वयाच्या आठ वर्षापर्यंत बँकेचे व्यवहार, बसमधून किंवा रेल्वेमधून प्रवास करताना सरकारी नियमांचे पालन करणे, वयोवृद्ध लोकांसोबतचा शिष्टाचार यातून आपली संस्कृती टिकवण्याविषयी शिकवल जात.शिक्षण पद्धती सोबत आर्थिक साक्षरता ही महत्त्वाची आहे. असे प्रतिपादन डॉक्टर चेतन नरके यांनी आयोजित कार्यक्रमावेळी केले.

ज्यामुळे देशातील युवकांनसोबत समाजाची तसेच देशाची सर्वांगीण प्रगती होते. आपणही या सर्व गोष्टी जोपासल्या पाहिजेत व आपल्या विद्यार्थ्यांसाठी, देशाच्या भविष्यासाठी नवीन कल्पनांवरती काम केले पाहिजे. फक्त पैसा मिळवणे हे ध्येय न ठेवता, स्वतःचा सर्वांगीण विकास करणे हे अधिक महत्त्वाचे आहे.