कोल्हापूर : स्वच्छता ही सेवा या पंधरवडा अभियानाअंतर्गत व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने महालक्ष्मी मंदिर व टेंबलाईवाडी मंदिर परिसरामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ सकाळी 8 वाजता भवानी मंडप येथे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहा.आयुक्त नेहा आकोडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्य लेखापाल संजय सरनाईक, उपशहररचनाकार रमेश मस्कर, एन.एस.पाटील, पशुवैदयकीय अधिकारी डॉ.विजय पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पेावार, उपशहर अभियंता सुरेश पाटील, नगरसचिव सुनिल बिद्रे, अधिकारी, कनिष्ठ अभियंता व कर्मचारी उपस्थित होते.
या स्वच्छता मोहिमेत महालक्ष्मी मंदिर परिसर, भवानी मंडप, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वाररोड, जोतिबा रोड परिसराची आरोग्य, पवडी, परवाना, विद्युत, आरोग्य प्रशासन, मुख्यलेखापाल विभाग, नगरसचिव कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली. तसेच टेंबलाईवाडी मंदिर परिसराची आरोग्य विभाग, पवडी विभाग, नगररचना विभाग, कार्यशाळा विभाग, घरफाळा विभागामार्फत स्वच्छता करण्यात आली.
स्वच्छता ही सेवा या पंधरवडा अभियानाअंतर्गत यापुर्वी वॉल पेंटींग स्पर्धा, पंचगंगा घाट परिसराची, महापालिकेच्या सर्व कार्यालयाची स्वच्छता करण्यात आली आहे.